Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमावतात?

Affiliate Marketing म्हणजे काय?

Affiliate म्हणजे संलग्न आणि Affiliation म्हणजे संलग्नित होणे. उदा. महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्नित असते, दोन वेगवेगळ्या संस्था एकमेकांशी संलग्नित असतात. Affiliate Marketing म्हणजे एखाद्या कंपनी सोबत संलग्नित होणे व त्याच्या वस्तू,सेवा विकणे आणि त्या बदल्यात मोबदला कमावणे. आपल्या वेबसाईट अथवा सोशल मीडिया प्रोफाईल द्वारे वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी प्रयत्न करणे, विकल्या गेलेल्या प्रत्येक वस्तू/सेवा यांच्या किमतीनुसार मोबदला (commission) दिला जातो.  

एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमावतात?

ब्लॉगिंग, सोशल मीडिया, युट्युब, ई-मेल अशा विविध मार्गांनी एफिलिएट मार्केटिंग करता येते. Affiliate Marketing मधून पॆसे कमावण्यासाठी स्वतःची वेबसाईट असणे बंधनकारक नाही, मात्र वेबसाईट असेल तर अधिक जास्त प्रमाणात कामे करता येते. सोशल मीडिया खात्यांवर अफिलिएट लिंक साठी काही मर्यादा असतात, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येत नाही. सोशल मीडिया वर लिंक शेअर करण्यासाठी काही कंपन्या परवानगी देतात तर काहींच्या नियमात बसत नाही. 

Affiliate Marketing साठी भाषेतही अट नाही. हिंदी, इंग्रजी, मराठी कुठलीही भाषेत वेबसाईट असेल तरी चालेल. जर तुम्ही नवखे आहेत आणि अफिलिएट मार्केटिंग सुरु करत आहात तर Amazon Affiliate Program पासून सुरुवात करा. नवीन ब्लॉगर्स साठी Amazon हा पर्याय सर्वोत्तम आहे. अमेझॉन जगातील सर्व देशात आहे म्हणून फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर अफिलिएट मार्केटिंग करता येते.

एफिलिएट लिंक 

ज्या एफिलिएट कंपनी मध्ये तुम्ही जोडले जाता, तेथून तुमच्यासाठी एक डॅशबोर्ड दिला जातो जे तुमचे खाते असते. जिथे वस्तू व सेवा निवडून त्याच्या लिंक तयार केल्या जाऊ शकतात. या लिंक ला affiliate link असे म्हणतात. वेबसाईट किंवा सोशल मीडिया खात्यांवर ह्या लिंक ठेवता येतात. या लिंक वर क्लिक करून जर कोणी ती वस्तू खरेदी केली तर किमतीच्या प्रमाणात काही मोबदला दिला जातो.     

नियम व अटी 

प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत. कुठलाही एफिलिएट प्रोग्राम जॉईन करण्याआधी त्याचे नियम वाचणे गरजेचे असते. Policy, terms & Conditions या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. कारण हे नियम पाळले नाहीत तर संबंधित एफिलिएट खाते बंद करण्यात येते. अवैध मार्गाचा वापर टाळण्यासाठी हे नियम व अटी बनवल्या जातात.

Leave a Comment

error: Content is protected !!