fbpx
SEO in Marathi, SEO म्हणजे

SEO म्हणजे काय? What is SEO in Marathi?

SEO in Marathi

SEO (Search Engine Optimization) म्हणजेच वेबसाईट गूगल सर्च मध्ये रँक होण्यासाठी वापरली जाणारी तांत्रिक पद्धत. एखादी व्यक्ती जेव्हा गूगल सर्च वर काही माहिती शोधते, तेव्हा संबंधित माहिती असलेल्या वेबसाईट दाखवल्या जातात. सर्च केलेला शब्द/वाक्य यानुसार माहिती दर्शवली जाते. SEO म्हणजेच गूगल सर्च पानावर वेबसाईट रँक करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत.

SEO मध्ये कीवर्ड, विषय, माहिती, प्रतिमा इत्यादी गीष्टी महत्वाच्या असतात. ज्या विषयावर आपण पोस्ट लिहितो त्याविषयी शब्द/वाक्य आणि सविस्तर माहिती जुळवून आणता आली पाहिजे. आपल्याशी स्पर्धा असणाऱ्या वेबसाईट कोणत्या युक्त्या वापरतात याचे आकलन करता आले पाहिजे. तसेच काही तांत्रिक गोष्टी देखील तपासल्या पाहिजेत.

SEO चे प्रकार

1. On Page SEO

ऑन पेज एसईओ म्हणजे आपल्या वेबसाईट/पेज वर दिसणाऱ्या गोष्टींद्वारे SEO करणे. यामध्ये इमेज, युआरएल, कीवर्ड, टायटल, डिस्क्रिप्शन अशा अनेक बाबींचा समावेश होतो. आपण ज्या विषयावर पोस्ट लिहीत आहोत त्यावर कुठला कीवर्ड सर्वाधिक सर्च केला जातो, याची माहिती असणे आवश्यक आहे. संबंधित पोस्ट मध्ये कीवर्डचा प्रभावीपणे वापर करता आला पाहिजे.   

2. Off Page SEO

ऑफ पेज एसईओ म्हणजे वेबसाईटच्या न दिसणाऱ्या/अप्रत्यक्ष बाबींवर काम करणे. बॅकलिंक तयार करणे, गेस्ट पोस्ट लिहिणे, विविध सर्च कन्सोल मध्ये वेबसाईट नोंदवणे. या सोबतच वेबसाईट स्पीड वाढवणे, AMP पेज बनवणे हे देखील Off Page SEO साठी महत्वाचे आहे. गूगल, याहू, बिंग अशा सर्व सर्च वेबमास्टर टूल मध्ये वेबसाईट इंडेक्स साठी नोंदवणे जेणेकरून रँकिंग वाढेल. 

SEO पद्धती 

1. White Hat SEO

कुठल्याही अटींचे उल्लंघन न करता आणि गूगलच्या नियमांचे पालन करून एसईओ करणे म्हणजेच White Hat SEO. वेबसाईट SEO करताना गुगलच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. White Hat SEO मध्ये काही गोष्टी नियमबाह्य आहेत जसे अवैध मार्गाने SEO करणे, कॉपी करणे, कीवर्ड स्टफिंग करणे. 

2. Black Hat SEO 

गुगलच्या नियमांचे उल्लंघन करून जर SEO केले गेले तर त्याला Black Hat SEO असे संबोधले जाते. यामध्ये दुसऱ्याचा कन्टेन्ट कॉपी करणे, कीवर्ड स्टफिंग करणे, कॉपीराईट असलेल्या प्रतिमा वापरणे, अवैध ट्राफिक आणणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. असे केल्याने गूगल कधीच साईट इंडेक्स करणार नाही.  (SEO in Marathi)

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!