fbpx
influencer meaning in marathi, social media influencer meaning in marathi, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे पैसे कसे कमावतात?

तंत्रज्ञानाच्या युगात होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक गोष्टींमध्ये कमालीचे बदल होत आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. सोशल मीडियाचा वापर वाढत आहे, तरुण मंडळी नव्हे तर सर्वच वयातील व्यक्ती सोशल मीडिया चा वापर करत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने यावर जाहिराती देखील वाढल्या आहेत. 

Influencer म्हणजे काय? What is Influencer in Marathi? 

Influence म्हणजे “प्रभाव” अथवा “परिणाम”. इन्फ्लुएन्सर म्हणजे प्रभावित करणारा. उदा. एखादा व्यक्तीच्या बोलण्याचा, वागण्याचा परिणाम तुमच्यावर आहोत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून influence झालात. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय हे लक्षात आले असेल, आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय ते जाणून घेऊ.  

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? What is social media influencer in Marathi?

तुम्ही स्वतः जर सोहळा मीडियाचा वापर करत असाल तर, तुम्ही अनेक पेजेस ला फॉलो करत असाल. हे पेजेस अनेक वस्तू व सेवा घेण्यासाठी प्रभावित करतात. जास्तीवेळा हे एखाद्या व्यक्तीचे पेज असते आणि या व्यक्तीद्वारे काही वस्तू/सेवा घेण्यासाठी जाहिरात केली जाते. Influencer म्हणजे एखाद्या ब्रँडच्या वस्तूंची जाहिरात पेजद्वारे करून लोकांना ती वस्तू विकत घेण्यासाठी आवाहन करणे. म्हणजेच ती जाहिरात करणारी व्यक्ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

पैसे कसे मिळतात ?

ज्या व्यक्ती एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात काम करत आहेत. संबंधित विषयावर फेसबुक पेज अथवा इंस्टग्राम अकाउंट तयार करता येते. दहा हजार अथवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले तर, अनेक ब्रँड अथवा कंपन्या तुम्हाला स्वतःहून जाहिरातीसाठी विनंती करतील. जाहिराती करण्याच्या बदल्यात काही मोबदला देखील दिला जातो. 

इतर प्लॅटफॉर्म वर जाहिराती साठी पैसे खर्च करणे आणि तेथून ग्राहक मिळवणे हे वेळखाऊ आणि खर्चिक असते. याऐवजी संबंधित वास्तूशी निगडित असणाऱ्या एका संघाला टार्गेट करून जाहिरात करणे सोपे ठरते. यामुळे जाहिरात त्याच लोकांना दिसेल ज्यांना संबंधित क्षेत्रात रस आहे. याचा थेट परिणाम विक्रीवर होतो आणि ब्रँड ला फायदा होतो. 

फेसबुक पेज, इंस्टा पेज, ट्विटर खाते, टेलिग्राम, लिंक्डइन आणि अशा बर्यात मंचावरून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स काम करतात आणि पैसे कमावतात. उदाहरणार्थ एखाद्या प्रसिद्ध इन्स्टाग्राम खात्यावर जाऊन पाहू शकता. तिथे रील्स अथवा पोस्ट च्या माध्यमातून कुठल्यातरी वस्तू घेण्यासाठी प्रभावित केले गेले असेल.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!