fbpx
What is Adsense in Marathi

गूगल ऍडसेन्स म्हणजे काय?

गूगल ऍडसेन्स म्हणजे काय? 

गूगल ऍडसेन्स म्हणजे वेबसाईट मालकांसाठी पैसे कमावण्याचा एक स्रोत आहे. ज्या प्रमाणे आपण घर खोली इतरांस वापरण्यास देतो आणि त्याचा मोबदला म्हणून प्रतिमहिना भाडे घेतो. त्याच प्रमाणे गूगल इतर वेबसाईट वरील काही जागा भाड्याने घेतो आणि त्याचा मोबदला दिला जातो. संबंधित वेबसाईटवर जाहिराती दाखवल्या जातात, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून काही भाग मोबदला म्हणून दिला जातो.

ब्लॉग, वेबसाईट, मोबाईल अँप, युट्युब या सर्व प्रकारातून जाहिरातीतून पैसे कमवता येतात.Google AdSense द्वारे जाहिराती दाखवल्या जातात आणि त्यातून मिळालेले उत्पन्न संबंधित मालकांसोबत वाटून घेतले जाते. ब्लॉग, वेबसाईट अथवा युट्युब वर ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यावर Click, View, Impression यानुसार पैसे दिले जातात. अँप ऍडमॉबद्वारे पैसे कमावता येतात, जितके जास्त वापरकर्ते तितके जास्त पैसे मिळतात.

जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल आणि त्यावर जास्तीत जास्त लोक भेट देत असतील तर तुम्ही ऍडसेन्सद्वारे पैसे कमवू शकता. तसेच अँप अथवा युट्युब चॅनेलद्वारे देखील चांगली कमाई करता येते. ऍडसेन्स च्या एकाच खात्यात मोबाईल अँप, युट्युब, ब्लॉग, वेबसाईट जोडता येतात. जेवढे जास्त लोक भेट देतील तेवढ्या जास्त प्रमाणात जाहिराती आणि कमाई होते. 

ऍडसेन्स साठी अर्ज/अप्लाय कसे करावे?

जर वरील कुठल्याही मार्गाने पैसे कमावण्यास सुरुवात करायची असेल तर, आधी ऍडसेन्स कडून परवानगी घेणे आवश्यक असते. सर्वप्रथम ऍडसेन्स या प्लॅटफॉर्म वर लॉगिन करून आपले खाते बनवावे लागेल. आपल्या वेबसाईट अथवा इतर गोष्टींसाठी अप्लाय करावे लागेल. गूगल वेबसाईट निरीक्षण करून आपल्याला परवानगी देईल आणि त्यानंतरच जाहिरात दिसण्यास सुरुवात होईल.

गूगल ऍडसेन्सच्या अटी व नियमांचे पालन केले असेल तर लगेच परवानगी दिली जाते, नसेल तर बदल सुचवला जातो. सुचवलं गेला बदल करून परत अप्लाय करता येते. परवानगी भेटल्यानंतर जाहिरात दाखवण्यासाठी मुख्य दोन पर्याय दिले गेले आहेत. त्यात स्वयंचलित जाहिराती (auto ads) आणि  गरजेनुसार (Manual) असे पर्याय दिले गेले आहेत. आपल्या वेबसाईटच्या प्रकारानुसार स्वतः वेगवेगळ्या आकाराच्या जाहिराती बनवता येतात अथवा स्वयंचलित जाहिराती चालू ठेवता येतात. 

गूगल ऍडसेन्स मधून किती कमाई होते ?

प्रत्येक प्रकारानुसार कमाईचे स्वरूप बदलते. ब्लॉग अथवा वेबसाईट असेल तर त्यावर येणाऱ्या रहदारीवर कामे अवलंबून आहे. तीसेक एका पानावर किती जाहिराती दिसतात हे देखील पहिले जाते. जास्त रहदारी तर जास्त जाहिराती दिसतील. जास्त जाहिराती म्हणजेच जास्त नफा. मोबाईल अँपला देखील असाच निकष लागू होतो. युट्युब साठी प्रत्येक view नुसार पैसे मिळतात. 

काही वेळेस जास्त कमाई होते तर काही वेळेस कमी. ज्याप्रमाणे जाहिरातदार ठरवतात त्याप्रमाणे दर ठरतात. प्रत्येक हजार इम्प्रेशन वर जवळपास. $0.50 ते $6.00 मिळू शकतात. तसेच क्लिक जास्त असतील तर अजून जास्त पैसे मिळतात. जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात आपण स्वतः अथवा मित्रांना क्लिक करण्यास सांगणे असे करू नका. गुगल ला हे समजण्यासाठी जास्त वेल लागणार नाही आणि आपले अकॉउंट कायमचे बंद केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!